आटपाडी तालुक्यात आज ५ जण कोरोना पॉझिटीव्ह
तळेवाडीत १ तर नेलकरंजी ४ जण कोरोनाग्रस्त
माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी तालुक्यात आज ५ जण कोरोना पॉझिटीव्ह सापडल्याने पुन्हा एकदा जिल्ह्यात तालुका चर्चेत आला आहे.
आज नवीन रूग्णामध्ये ४ महिला तर १ पुरुषाचा समावेश आहे. यामध्ये नेलकरंजी येथे पहिल्या कोरोनाग्रस्ताच्या संपर्कामध्ये आलेल्या ४ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये तीन महिला व एका पुरुषाचा समावेश आहे. तर तळेवाडी येथील एका युवतीचा नवीन रूग्णामध्ये यामध्ये समावेश असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. साधना पवार यांनी दिली आहे.
कालच आटपाडी शहरामध्ये एकजण कोरोना पॉझिटीव्ह आढळून आला होता. तर आज तालुक्याच्या ग्रामीण भागामध्ये एकाच दिवशी ४ रुग्ण आढळून आल्याने खळबळ माजली आहे.